
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मूळगांव आंबवडेत स्मारक, सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट
रत्नागिरी जिल्ह्यातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मूळगाव असलेल्या आंबडवे येथे भव्य स्मारक उभारले जाणार असून त्यासाठी पहिला व दुसरा टप्पा असे प्रस्ताव तयार करावेत, असे निर्देश सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी दिले.
संपूर्ण आंतरराष्ट्रीय स्मारकाचा प्रारूप आराखडा तत्काळ तयार करून पहिल्या टप्प्यात ३५ गुंठे जागेत या मुख्य स्मारकाची निर्मिती होणार असून भविष्यात तब्बल ९ एकर जागेवर आंतरराष्ट्रीय दर्जाचा संपूर्ण स्मारक परिसर विकसित करण्यात येणार असल्याची माहिती या बैठकीत दिली.
गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या मतदारसंघात हे गाव असून या ठिकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक व्हावे यासाठी त्यांनी पुढाकार घेतला आहे. त्यानुसार मंत्री शिरसाट यांच्या अध्यक्षतेखाली १२ ऑगस्ट रोजी बैठक आयोजित करण्यात आली होती.www.konkantoday.com




