
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व हिंदी भाषिक बँक शाखा व्यवस्थापक व कर्मचारी यांच्यावर नियंत्रण आणावे व्यापारी संघटनेची मागणी
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व हिंदी भाषिक बँक शाखा व्यवस्थापक व कर्मचारी यांच्यावर नियंत्रण आणावे. ग्राहकांना हिंदी, इंग्लिश भाषेत फॉर्म भरणे जमत नाही म्हणून तेथील कर्मचारी ग्राहकांना योग्य वागणूक देत नाहीत.ग्राहकांना तुच्छतेची वागणूक देणार्या अशा कर्मचारी, अधिकार्यांवर कारवाई करण्याबाबत संबंधित सर्वच बँकांच्या व्यवस्थापनांना आपण आदेश द्यावेत, अशी मागणी सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघाच्या वतीने जिल्हाधिकारी अनिल पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
जिल्हा व्यापारी महासंघाचे अध्यक्ष प्रसाद पारकर, कार्यवाह नितीन वाळके, ग्राहक पंचायत राजचे जिल्हा प्रतिनिधी विष्णुप्रसाद दळवी आदींसह संघटनेच्या प्रतिनिधींनी जिल्हाधिकारी अनिल पाटील यांची भेट घेऊन हे निवेदन दिले.