
कुवारबाव ज्येष्ठ नागरिक संघ सभागृहात १३ जुलै रोजी मोफत आरोग्य शिबिर, रोटरी क्लब ऑफ रत्नागिरी मिडटाउन यांच्या मार्फत शिबिराचे आयोजन.
रत्नागिरी, * : रत्नागिरीतील नागरिकांसाठी एक महत्त्वाची आरोग्य संधी उपलब्ध झाली आहे. रोटरी क्लब ऑफ रत्नागिरी मिडटाउन यांच्या वतीने रविवार, १३ जुलै २०२५ रोजी सकाळी ९ ते दुपारी १२ या वेळेत कुवारबाव परिसर जेष्ठ नागरिक संघ हॉल येथे मोफत आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले आहे.या शिबिरात सहभागी नागरिकांना विविध आरोग्य तपासणी सेवांचा लाभ घेता येणार आहे, ज्यात दंत चिकित्सा, गुडघे आणि सांध्यांची तपासणी, तसेच हिमोग्लोबिन (Hb) आणि जनरल आरोग्य तपासणी यांचा समावेश आहे.हे शिबिर सर्वांसाठी खुले आणि पूर्णपणे विनामूल्य आहे. कुवारबाव परिसरातील तसेच रत्नागिरीतील इतर नागरिकांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन कुवारबाव परिसर जेष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष श्री. मारुती अंबरे आणि रोटरी क्लब रत्नागिरी मिडटाउन यांनी केले आहे.
शिबिराचा तपशील:
दिनांक: रविवार, १३ जुलै २०२५
वेळ: सकाळी ९ ते दुपारी १२
*स्थळ*: कुवारबाव परिसर जेष्ठ नागरिक संघ हॉल, रत्नागिरी
उपलब्ध सेवा*: दंत चिकित्सा, गुडघे व सांधे तपासणी, Hb आणि जनरल तपासणी
प्रवेश: सर्वांसाठी मोफत
नागरिकांनी या आरोग्य शिबिरात सहभागी होऊन आपल्या आरोग्याची तपासणी करून घ्यावी, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.