
सहाशे ठेकेदारांची आठशे कोटींची बिले थकित.
गेली तीन वर्षे जिल्ह्यातील ६०० ठेकेदारांची ८०० कोटी रुपयांची बिले अद्याप अदा झालेली नाहीत. ही रक्कम थकित असल्याने आमच्यावर उपासमारीची वेळ येऊन ठेपली आहे. अशा परिस्थितीतही ’कामे करा’ असा तगादा प्रशासनाकडून लावला जातो आहे. शासनाने आमच्यावर आत्महत्या करायची वेळ आणू नये. आमची थकित बिले त्वरित अदा करावीत, अशा मागणीचे निवेदन जिल्हा ठेकेदार संघटनेने निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांना सादर केले.आर्थिक परिस्थितीने ग्रासलेल्या चिपळूण, गुहागर, खेड, दापोली, मंडणगड, रत्नागिरी, राजापूर, लांजा येथील ठेकेदारांनी शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयात आपल्या अडचणींचे निवेदन देण्यासाठी गर्दी केली होती. ३ वर्षांपासून केलेल्या कामांची बिले १० ते १५ टक्के या प्रमाणात मिळाली.www.konkantoday.com