
रत्नागिरीतून चोरलेली दुचाकी लांजातील नाकाबंदीत सापडली.
येथे पोलिसांनी नियमित नाकाबंदी सुरू होती. त्यात एक दुचाकीस्वार पोलिसांना पाहून न थांबताच निघून गेला. त्यामुळे शंका आलेल्या लांजा पोलिसांनी ई चलन ऍपवरुन माहिती घेतली आणि ही दुचाकी रत्नागिरीतून चोरी झाल्याचे लक्षात आले. त्यानंतर वेगाने हालचाली करुन या दुचाकीस्वाराचा शोध सुरू केला. त्यात त्याला दुचाकीसह ताब्यात घेण्यात आले आहे.लांजा शहरातील आसगे कोर्ले फाटा येथे पोलिसांनी नाकाबंदी केली होती. या दरम्यान ज्युपिटर दुचाकी (एमएच ०८ एएस २४१८) घेऊन एकजण तेथे आला. पोलिसांना पाहून तो न थांबता निघून गेल्याने पोलिसांना त्याचा संशय आला. त्या दुचाकींची ई चलन ऍपवर त्यांनी माहिती घेतली असता ही दुचाकी २०२४ मध्ये चोरी झाल्याची आणि रत्नागिरी शहर पोलीस ठाणेत त्या बाबत गुन्हा दाखल असल्याची माहिती त्यांना मिळाली. ही माहिती प्राप्त झाल्यानंतर पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस शिपाई किशोर पवार व महिला हवालदार साक्षी भुजबळराव यांनी दुचाकीस्वाराचा शोध सुरू केला. तो लांजा आगरवाडीतील असल्याचे निष्पन्न झाल्याने त्याला दुचाकीसह चौकशीसाठी ताब्यात घेऊन पुढील कारवाई करण्यासाठी शहर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले. पोलिसांनी दाखवलेल्या चाणाक्षपणामुळे चोरीला गेलेल्या दुचाकीचा छडा लागला असून अधिक तपास रत्नागिरी शहर पोलीस करत आहेत.www.konkantoday.com