
मत्स्यगंधा एक्सप्रेसमधे प्रवास करणाऱ्या महिलेचेदोन लाखांहून अधिक किमतीचे दागिने लंपास.
मत्स्यगंधा एक्सप्रेसमधून प्रवास करणाऱ्या एका महिलेची झोपेत असताना चोरी झाली असून, अज्ञात चोरट्याने तब्बल ₹2,89,410 किमतीचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे.ही घटना 5 जुलै रोजी पहाटे 2.30 च्या सुमारास खेड रेल्वे स्थानक परिसरात घडली. संबंधित महिला गाडी क्रमांक 12620 मत्स्यगंधा एक्सप्रेसच्या बोगी क्रमांक 53, सीट नंबर 60 या जागेवर झोपून प्रवास करत होत्या. याच वेळी अज्ञाताने त्यांच्या झोपेचा गैरफायदा घेत बॅगेतील मौल्यवान ऐवज चोरून नेला.प्रकरणी महिलेने 5 जुलै रोजी सायंकाळी 7:38 वाजता खेड पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली असून, खेड पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध चोरीचा गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.