
भूसंपादनाचा योग्य मोबदला देणार : प्रांताधिकारी.
वाटद एमआयडीसीसंदर्भात हरकतींच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी तालुक्यातील कोळीसरे व मिरवणे या दोन गावांमधील ग्रामस्थांची सुनावणी प्रक्रिया येथील उपविभागीय अधिकारी जीवन देसाई यांच्या कार्यालयात पार पडली. परिसरात कोणताही प्रदुषणकारी प्रकल्प होणार नाही, या बाबत औद्योगिक विकास महामंडळाकडून लेखी म्हणणे सादर करण्यात आले. तसेच २०१३ च्या भूसंपादन कायद्यानुसार जमिनींचा योग्य मोबदला देण्यांत येईल, असेही यावेळी उपविभागीय अधिकारी जीवन देसाई यांनी सांगितले.
रत्नागिरीसह उंडी-रिळ परिसरात सेमी कंडक्टरचा प्रकल्प तर वाटद पंचक्रोशीत बंदुका बनवणारा रिलायन्सचा प्रकल्प प्रस्तावित आहे, यासाठी वाटद, कोळीसरे, मिरवणे, कळझोंडी, गडनरळ परिसरातील जागेचा समावेश आहे. या प्रकल्पासाठी प्रस्तावित जागेची एकत्रित मोजणी प्रक्रिया पूर्ण झाली आहे. कोळीसरे व मिरवणे या दोन गावांमधील जांगेचे अधिग्रहण करण्यासंदर्भात शुक्रवारी हरकती दाखल केलेल्या ग्रामस्थांची सुनावणी प्रक्रिया पार पडली.कोळीसरे व मिरवणे येथून वैयक्तीक अर्जदार आणि खातेदारांव्यतिरिक्त ५० ते ६० ग्रामस्थ या सुनावणीसाठी सकाळी ११ वाजता उपस्थित होते. सायंकाळी ४ नंतर दोन्ही गावातून अर्ज केलेल्या जिजाऊ संघटनेच्या १०२ अर्जदारांपैकी फक्त ३ अर्जदार सुनावणीला उपस्थित होते. प्रकल्पामध्ये गावातील वातील कोणतेही घर, धार्मिक ठिकाण, पाण्याचे स्त्रोत, कलम बागा, गावातील रस्ते, पायवाटा बाधित होणार नाहीत याची दक्षता घ्यावी. तसेच परिसरात कोणताही प्रदुषणकारी प्रकल्प होवू नये. गावातील ग्रामस्थांना रोजगार मिळावा, यासाठी परिसरात आवश्यक असे कौशल्य विकास केंद्र स्थापन करावे. जेणेकरून प्रकल्पासाठी आवश्यक तंत्रज्ञान ग्रामस्थांना अवगत करता येईल. तसेच जमिनीला योग्य तो मोबदला मिळावा, अशी मागणी करण्यात आली.www.konkantoday.com