
दापोली तालुक्यातून मायलेक बेपत्ता…
दापोली: -*दापोली तालुक्यातील लाडघर येथून आपल्या लेकरासहित एक माता बेपत्ता झाल्याची तक्रार दापोली पोलीस स्थानकात नोंद करण्यात आली आहे.
याबाबत दापोली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मानसी गितेश म्हसकर वय वर्ष 23 आणि श्रीशा गीतेश म्हसकर वय वर्ष तीन या दोघी आपल्या माहेरी आईकडे विनया विलास घडवले मौजे लाडघर शंकरवाडी येथे राहण्यासाठी आल्या होत्या. मात्र २९ जून रोजी सायंकाळी चार वाजता चे सुमारास मानसी आपली मुलगी श्रीशा हिच्यासह कोणाला काहीही न सांगता लाडघर येथील आपल्या माहेरच्या घरातून बाहेर पडल्या त्या उशीरा पर्यंत कोठेही आढळून आल्या नाहीत . संबंधितांकडे चौकशी करूनही त्यांची कोणतीही माहिती न मिळाल्यामुळे मानसी म्हसकर यांच्या आई विनया विलास घडवले यांनी दिनांक ३० जून रोजी दापोली पोलीस स्थानक येथे आपली लेक आणि नात हरवल्याची तक्रार दाखल केली आहे .पोलीस तपास सुरू आहे.