शरद पवार म्हणाले जय कर्नाटक, आदित्य ठाकरेंचा जय उत्तरप्रदेशचा नारा; शिंदेंच्या सेनेकडूनही आता ‘तो’ जुना व्हिडीओ शेअर.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल (शुक्रवार, 4 जुलै) पुण्यात एका सार्वजनिक कार्यक्रमात ‘जय हिंद, जय महाराष्ट्र, ‘जय गुजरात’ अशी घोषणा दिली.त्यांच्या या घोषणेनंतर नव्या राजकीय चर्चेला तोंड फुटलं असून विरोधकांकडून उपमुख्यमंत्री शिंदेसह सरकारवर जोरदार टीका होताना दिसत आहे. तर शिवसेना शिंदे गट यांच्याकडून देखील जशाच तसं प्रत्युत्तर दिलं जात आहे.दरम्यान, ठाकरेंच्या शिवसेनेने शिंदेंना जय गुजरातवरून लक्ष केल्यानंतर शिंदेंच्या सेनेकडूनही आता ठाकरे पिता-पुत्र आणि शरद पवार यांचा जुना व्हिडिओ समोर आणत टिका करणार्‍यांना आरसा दाखवला आहे.

शिंदेच्या सेनेकडून व्हायरल करण्यात आलेल्या व्हिडिओत शरद पवार हे जय हिंद जय कर्नाटक जय महाराष्ट्र म्हणत आहेत. तर उद्धव ठाकरेंकडूनही जय गुजरातची 2019च्या लोकसभा निवडणूकीतला व्हिडिओ समोर आणला आहे. तर आदित्य ठाकरेंचा जय उत्तरप्रदेश म्हणाल्याचा व्हिडिओ समोर आणला आहे. त्यामुळे आज ठाकरे बंधुकडून शिंदेच्या वक्तव्याचा समाचार घेण्याची शक्यता असतानाच शिंदेंनीही ठाकरेसह पवारांना आरसा दाखवला आहे.उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी आज पुण्यात एका सार्वजनिक कार्यक्रमात ‘जय हिंद, जय महाराष्ट्र, ‘जय गुजरात’ अशी घोषणा दिल्याचं पाहायला मिळालं. यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह व्यासपीठावर उपस्थित होते. एकनाथ शिंदे यांच्या जय गुजरात या घोषणेवर विरोधकांनी चांगलीच टीका केलीय.

अमित शाहंच्या डुप्लिकेट शिवसेनेचे खरं रुप बाहेर आल्याचे म्हणत संजय राऊतांनी शिंदेंचा समाचार घेतला. दरम्यान, विरोधकांच्या या टीकेनंतर शिवसेना शिंदे गटाच्या नेत्या शितल म्हात्रे यांनी देखील उद्धव ठाकरेंचा एक व्हिडीओ ट्वीट केलाय.यामध्ये उद्धव ठाकरे यांनी देखील ‘जय गुजरात’ अशी घोषणा दिल्याचे पाहायला मिळत आहे. उद्धव ठाकरेंचा एक जुना व्हिडीओ शितल म्हात्रे यांनी ट्वीट केला आहे. यामध्ये उद्धव ठाकरे हे आप आगे चलो हम साथ है, जय हिंद जय महाराष्ट्र जय गुजरात म्हणत असल्याचे दिसत आहे. अनेक जण हे विसरले असतील म्हणून परत लक्षात आणून द्यायचा हा प्रयत्न असे म्हणत शितल म्हात्रे यांनी उद्धव ठाकरेंना टोला लगावलाय.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button