
वारंवार अपघात होवूनही भरणेतील नव्या जगबुडी पुलाचे ’ऑडिट’ कागदावरच?
मुंबई-गोवा महामार्गावरील भरणे येथील नव्या पुलावरील जगबुडी नदीत कार दरीत कोसळून झालेल्या भीषण दुर्घटनेस ६ जणांना बळी गेल्यानंतर राष्ट्रीय महामार्ग खात्याच्या अधिकार्यांनी घटनास्थळाची पाहणी केली. यानंतर १५ दिवसातच पुलाचे ’ऑडिट’ करण्याचे संकेतही दिले होते. मात्र महिनाभराचा कालावधी लोटूनही ’ऑडिट’ कागदावरच राहिल्याची बाब समोर आली आहे. राष्ट्रीय महामार्ग खात्याच्या अनास्थेबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे.भरणे येथील नवा जगबुडी पूल अपघाताच्यादृष्टीने शापित बनला आहे. अवजड वाहतुकीच्या वाहनांना सर्रासपणे घडणार्या अपघातांमुळे जीव मुठीत धरून मार्गक्रमण करावे लागत आहे. जगबुडी नदीत कार कोसळून ६ जणांचा हकनाक जीव गेल्यानंतर पुन्हा एकदा नवा जगबडी पूल चर्चेत आला. सद्यस्थितीत संरक्षक भिंत उभारणीचे काम सुरुच आहे. ही संरक्षक भिंत अपघात कितपत रोखेल हा देखील प्रश्नच आहे.www.konkantoday.com