
रत्नागिरी शहरालगत ग्रामपंचायत भागात मोकाट गुरांच्या झुंडीचा सुळसुळाट.
रत्नागिरीत सध्या मोकाट गुरांच्या झुंडीने नागरिक हैराण झाले आहेत. शहर परिसरातच नव्हे तर शहरालगतच्या एमआयडीसीसह नाचणे, शिरगांव, एमआयडीसी, मिरजोळे, कुवारबाव अशा ग्रामपंचायत परिसरातही या मोकाट गुरांच्या झुंडी फिरत आहेत. या गुरांचे कळप रस्त्यावर कुठे ठाण मांडून तर रस्त्यावर उधळताना अपघाताच्या धोका वाढला आहे. प्रशासनाने या मोकाट गुरांच्या समस्येकडे गांभिर्याने उपाययोजना आखण्याची मागणी नागरिकांतून होत आहे.रत्नागिरी शहरात मोकाट गुरांचा उपद्रव रस्त्यावर सुरू आहे. या गुरांच्या वावराने त्रस्त झालेल्या नागरिक, वाहनधारकांची सुटका करण्यासाठी नगर परिषदेने त्या गुरांची धरपकड मोहीम हाती घेतली. तरीही हा उपद्रव कायमचा मिटलेला नाही असे असताना शहरालगतच्या एमआयडीसी परिसर, नाचणे, शिरगांव, मिरजोळे, भाट्ये, कुवारबाव या परिसरातील रस्त्यांवर गुरांचा ठिय्या लागलेला दिसून येतो.www.konkantoday.com