
रत्नागिरी रेल्वे स्टेशनवर रेल्वेतून पडून महिला जखमी.
रेल्वेच्या गोवा संपर्कक्रांती एक्स्प्रेसने मुंबईकडे जाणाऱी महिला गाडीत चढत असताना पडली. उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हर्षदा कुणाल रजपुत (वय ३१, रा. मनवल पाडा, विरार) असे जखमी महिलेचे नाव आहे. ही घटना बुधवारी (ता. २) दुपारी दोनच्या सुमारास रत्नागिरी रेल्वेस्टेशन येथे घडली.पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, हर्षदा, तीचे पती, नातेवाईक असे संपर्कक्रांती एक्स्प्रेसने मुंबईकडे जाण्यासाठी रत्नागिरी रेल्वेस्टेशन येथून जात असताना गाडीत चढत असताना हर्षदा या पाय घसरुन पडल्या. त्यामध्ये त्या जखमी झाल्या उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याबाबत जिल्हा रुग्णालयाच्या पोलिस चौकीत नोंद करण्यात आली आहे.