
रत्नागिरी जिल्ह्यात ४०९ कोटीचा जीएसटी वसूल, जिल्ह्यात कर चुकवेगिरीचे प्रमाण कमी.
वस्तू आणि सेवा कर विभागाने २०२४-२५ या आर्थिक वर्षात जिल्हयात ४०९ कोटीचा कर वसूल केला आहे. इतर जिल्ह्यांच्या तुलनेत रत्नागिरी जिल्ह्यात कर चुकवेगिरीचे प्रमाण कमी असून मार्च महिन्यात १०० टक्के कर वसूल करण्यात या विभागाने यश मिळवले आहे. १६ लाखापेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या जिल्ह्यात ११ टक्के प्रदेशाचे शहरीकरण झाले आहे. मात्र लोकसंख्येच्या मानाने जीएसटी भरणार्यांची संख्या मात्र कमी असल्याचे सांगण्यात आले.संपूर्ण देशाचे कर संकलन २२ लाख ८ हजार ८६१ कोटी आहे. यातील महाराष्ट्राचे कर संकलन ३ लाख ५९ हजार ८५५ कोटी इतके आहे. त्या खालोखाल कर्नाटक १ लाख ५९ हजार ५८४ कोटी इतके आहे. जिल्ह्यातील ४ नगरपालिका आणि ५ नगर पंचायतींमध्ये व्यवसाय करणार्यांची संख्या अगदीच कमी असल्याचे आकडेवारीवरून दिसून येते. जिल्ह्यात लघु उद्योग सुरु होतात, मात्र या ना त्या कारणाने ते काही वर्षात अथवा काही महिन्यातच बंद होतात. त्यामुळे जीएसटीधारकांची संख्याही मर्यादितच असल्याचे पहायला मिळते.www.konkantoday.com