
युवतीसेना उत्तर रत्नागिरी जिल्हा अध्यक्षपदी सिद्धी ताई शिंदे यांची नियुक्ती.
शिवसेना युवती सेनेच्या उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्षपदी सिद्धी ताई शिंदे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सिद्धी ताई शिंदे या शिवसेनेच्या एकनिष्ठ कार्यकर्त्या असून, मागील अनेक वर्षांपासून त्या युवती सेनेच्या माध्यमातून सक्रियपणे सामाजिक कार्य करत आहेत.त्यांच्या नेतृत्वगुणांना आणि संघटन कौशल्याला ओळखून पक्षाकडून त्यांना ही जबाबदारी देण्यात आली आहे. या नियुक्तीमुळे उत्तर रत्नागिरी जिल्ह्यात युवती सेनेच्या कामकाजाला अधिक बळ मिळेल, अशी आशा व्यक्त केली जात आहे. सिद्धी ताई शिंदे यांनी आपल्या नियुक्तीनंतर प्रतिक्रिया देताना सांगितले की, ‘पक्षाने माझ्यावर दाखवलेला विश्वास मी पूर्णपणे सार्थ ठरवीन.
युवतींना न्याय, सुरक्षितता आणि सशक्तीकरण यासाठी कार्य करणे हे माझे मुख्य ध्येय राहील.’युवती सेना ही शिवसेनेची महिला आणि युवतींची शाखा असून, महिलांच्या प्रश्नांवर आवाज उठवणे, सामाजिक न्याय मिळवून देणे आणि महिलांना नेतृत्वासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देणे हे तिचे उद्दिष्ट आहे. या नियुक्तीनंतर पदाधिकाऱ्यांनी व स्थानिक कार्यकर्त्यांनी सिद्धी ताई शिंदे यांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.