
मतदान केंद्र निश्चितीचे निवडणूक आयोगाचे आदेश; राजकीय पक्षांच्या बैठका घेण्याचीही अधिकाऱ्यांना सूचना.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी आता राज्य निवडणूक आयोगाने मतदान केंद्रांची निश्चिती करण्याचे आदेश राज्यातील सर्व जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त आणि नगरपालिकांच्या मुख्याधिकाऱ्यांना शुक्रवारी दिले.प्रभाग/गण रचनेचा आदेश आयोगाने आधीच दिला असताना आता निवडणुकांच्या दृष्टीने आणखी एक पाऊल आयोगाने टाकले आहे.
मतदान केंद्रांची संख्या किती असावी, त्यासाठीचे निकष काय असावेत, तसेच तिथे कोणकोणत्या सुविधा असाव्यात याबाबतचे निर्देश आयोगाने दिले आहेत. मतदान केंद्रांच्या प्रारूप याद्या तयार करून त्या आपापल्या भागातील राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय पक्षांच्या प्रतिनिधींना त्यांची बैठक आयोजित करून द्याव्यात, असे आयोगाचे सचिव सुरेश काकाणी यांनी स्पष्ट केले आहे.