
प्रशासनाने धडक मोहीम हाती घेताच लांजातील व्यापार्यांनी स्वतः हटविली अतिक्रमणे.
लांजा शहरात महामार्गाचे काम रखडले आहे. अनेकांनी येथे दुकाने थाटली आहेत तर काही व्यवसायिकांनी दुकानाबाहेर अनधिकृत शेड काढून अतिक्रमण केले आहे. प्रशानसनातर्फे त्यांना २ २ जुलैपर्यंत अतिक्रमण हटवण्याचे आदेश देण्यात आले होते. गुरुवारी प्रशासनाने अतिक्रमण हटवण्याची मोहीम सुरु करताच व्यापारी व दुकानदारांनी स्वतःच आपले सामान हलवले. मात्र, काही दुकानांवर कारवाई करण्यात आली.लांजा शहरात बाजारपेठेत अनधिकृतपणे रस्त्याच्या दोन्ही बाजूस टपरीधारक व दुकानदारांनी दुकानासमोर छप्पर काढले होते आणि रस्त्याच्या मधोमध हातगाड्या लावून उद्योग व्यवसाय करत होते. शासनाने या अनधिकृत धंदे करणारे यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात यावे व दुकाने हटवावे असा आदेश दिला होता. गुरुवारी अतिक्रमण हटाव मोहीम सुरू करण्यापूर्वी काही दुकानदारांनी स्वतः हून छपरे काढली तर काहींनी दुकान हटवली तर काहींनी मुदत मागितली. लांजा शहरात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. शासकीय अधिकारी पोलिसांबरोबर उपस्थित होते. राजकीय पक्षांच्या नेत्यांनी दुकानदारांना आश्वासन दिले होते. मात्र कारवाईवेळी कोणीही पुढे आले नाही. काही दुकानदारांनी गटारावर पक्की बांधकामे केली होती. ही सर्व बांधकामे पाडण्यात आली.www.konkantoday.com