न्यायमूर्ती नियुक्तीत गुणवत्तेशी तडजोड केली जाणार नाही, न्यायवृंद पद्धतीत पारदर्शकता आणण्याची सरन्यायाधीश भूषण गवईंची ग्वाही!

मुंबई :* सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींच्या नियुक्तीत कोणत्याही प्रकारची तडजोड केली जाणार नाही. किंबहुना, न्यायवृंद पद्धतीत अधिकाधिक पारदर्शकता आणू, असे आश्वासन देशाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांनी शुक्रवारी दिले.न्यायव्यवस्थेत समाजातील सर्व घटकांना प्रतिनिधित्व मिळेल, अशी ग्वाहीही त्यांनी यावेळी दिली.गवई यांनी मे महिन्यात भारताचे ५२वे सरन्यायाधीश म्हणून पदभार सांभाळला. देशाच्या सरन्यायाधीशपदी नियुक्ती झाल्यानिमित्ताने बॉम्बे बार असोसिएशनने गवई यांचा सत्कार समारंभ आयोजित केला होता.

मुंबई उच्च न्यायालयाच्या ऐतिहासिक सेंट्रल हॉलमध्ये पार पडलेल्या या कार्यक्रमाला संबोधित करताना सरन्यायाधीश गवई यांनी उपरोक्त आश्वासन दिले.माजी सरन्यायाधीश संजीव खन्ना यांनी त्यांच्या कारकीर्दीत न्यायवृंदाने न्यायमूर्तींच्या नियुक्त्या करण्याच्या पद्धतीत पारदर्शकता आणण्याचा अधिकाधिक प्रयत्न केला. त्यांचा हा प्रयत्न आपणही पुढे सुरू ठेवल्याचेही गवई यांनी यावेळी प्रामुख्याने अधोरेखित केले. त्याचवेळी, न्यायवृंदाच्या कामकाजात हस्तक्षेप होत असल्याचे सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती दीपंकर दत्ता यांनी नागपूर येथे मागील आठवड्यात झालेल्या कार्यक्रमात केलेल्या वक्तव्याकडे लक्ष वेधले.तसेच, न्यायमूर्तींच्या नियुक्तीत अधिकाधिक पारदर्शकता आणण्याचे, गुणवत्तेशी कोणतीही तडजोड न करण्याचे आश्वासन दिले. न्यायमूर्ती म्हणून नियुक्ती करण्यासाठी आलेल्या नावांच्या शिफारशींमध्ये समाजाच्या सर्व घटकांतील प्रतिनिधींचा समावेश असेल, शिफारस करण्यात आलेल्या नावांचा सर्वतोपरी विचार केला जाईल, असेही सरन्यायाधीशांनी आश्वासित केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button