तरुणीच्या वडिलांच्या फिर्यादीवरून रत्नदुर्ग किल्ला येथे तरुणी आत्महत्या प्रकरणी प्रियकराविरोधात गुन्हा दाखल.

रत्नागितील रत्नदुर्ग किल्ल्यावरील पाण-भुयार स्पॉटजवळ समुद्रात उडी घेत सुखप्रित धाडिवाल (25, सध्या रा.पिंपळगाव नाशिक मुळ रा.एलनाबाद , जि. सिरसा हरीयाणा) या तरुणीला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी संशयित प्रियकराविरोधात शहर पोलिस ठाण्यात गुरुवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.जसस्मिक केहर सिंग (29, सध्या रा. सिध्दीविनायक नगर शिवाजीनगर, रत्नागिरी मुळ रा.भाटिया कॉलनी फतेहाबाद, हरियाणा) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयित प्रियकराचे नाव आहे. त्याच्या विरोधात बेपत्ता तरुणीचे वडील प्रकाशसिंग हरनेकसिंग धाडियाल (69, रा. एलनाबाद, जि. सिरसा हरियाणा) यांनी रत्नागिरी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.

त्यानुसार, फिर्यादींची मुगली सुखप्रित नाशिकमधून बेपत्ता झाल्याप्रकणी त्यांनी तेथील पिंपळगाव पोलिस ठाण्यात खबर दिली होती. ती बेपत्ता प्रकरणाच्या चौकशी दरम्यान सुखप्रित ही रत्नागिरी येथे आलेली असल्याचे त्यांना समजले तेव्हा ते रत्नागिरी येथे गुरुवारी आले होते. त्यावेळी त्यांना रत्नागिरी पोलिसांनी घटनास्थळी मिळून आलेले चप्पल आणि ओढणी दाखवली. त्या वस्तू आपल्या मुलीच्याच असल्याचे त्यांनी ओळखले. आपल्याम मुलीच्या जिवाचे बरेवाईट झाल्याचे लक्षात येताच त्यांना अश्रू अनावर झाले होते. आपल्या मुलीच्या घातपातास तिचा प्रियकरच जबाबदार असल्याचा त्यांनी आरोप केला. त्यांची मुलगी सुखप्रित हिचा मित्र जस्मिक केहर सिंग याने तिच्याशी मैत्री करन तिच्यासोबत रिलेशनशिपमध्ये असताना तिच्याशी असलेले नाते तोडून दुस-या मुलीसोबत रिलेशनशिप सुरु केले होते. त्याने तिला वेळोवेळी टाळून तिचा मानकिस छळ केला होता. ती रविवार 29 जून जस्मिक ला भेटण्यासाठी रत्नागिरी येथे आलेली असताना त्याने तिला न भेटताच तू परत नाशिकला जा असे सांगितले. त्यामुळे तिला मानसिक त्रास देवून फिर्यादी यांची मलगी सुखप्रित धाडीवाल हिला शिवसृष्टी भगवती किल्ला रत्नागिरी येथून समुद्राच्या पाण्यात उडी मारुन जीव देण्यासाठी प्रवृत्त केले असे त्यांनी दिलेल्या तक्रारीत नमूद करण्यात आहे. म्हणून तिच्या वडिलांनी गुरुवारी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन शहर पोलिसांनी संशयित प्रियकराविरोधात भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 108 पमाणे गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक सागर शिंदे करत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button