
कोकणच्या हापूस आंब्याचा हंगाम आता अंतिम टप्प्यात.
यंदा मात्र अक्षय तृतीयेच्या मुहूर्तालाही हापूसच्या विक्रीवर परिणाम झाला आता हापूस आंब्यांचा हंगाम आणखी केवळ दहा दिवसांचाच आहे, अशी माहिती वाशी येथील मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमधील आंबा व्यापाऱ्यांनी दिली.कोकणच्या हापूस आंब्याचा हंगाम आता अंतिम टप्प्यात असून, पुढील केवळ दहा दिवस हा सुगंधी आणि चवदार आंबा बाजारात उपलब्ध असेल, अशी माहिती एपीएमसीतील व्यापाऱ्यांनी दिली आहे.
यंदा हवामानातील बदलांमुळे हापूसचे उत्पादन घटल्याने बाजारात आवक कमी आहे. त्यामुळे येत्या १० मे पर्यंतच हापूसचा आस्वाद घेता येणार आहे. आंबाप्रेमींनो, ही संधी दवडू नका, असे आवाहन व्यापाऱ्यांनी केले आहे.एपीएमसी फळ बाजारात कोकणातून दररोज ४० ते ५० हजार हापूस आंब्याच्या पेट्यांची आवक होत असून, एपीएमसीच्या घाऊक बाजारात सध्या पाच डझनाची पेटी १२०० ते १५०० रुपये आणि चार डझनाची पेटी सुमारे २५०० ते ३५०० रुपयांपर्यंत विक्रीस उपलब्ध आहे.