
चिपळूण-गुहागर मार्गावर आंदोलन करणार्या १८ जणांवर कारवाई
निकृष्ट रस्त्याचे काम, सातत्याने होणारे वाहनचालकांचे अपघात व ठेकेदार, अभियंता चर्चेला सामोरे येत नसल्याने संतप्त ग्रामस्थांनी चिपळूण-गुहागर मार्गावर एकत्र येत सोमवारी महामार्ग रोको केला होता. या आंदोलनप्रकरणी पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला असून त्यानुसार १८ आंदोलनकर्त्यांवर चिपळूण पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाई केली.चिपळूण ते गुहागर या मुख्य मार्गाला जोडणारा रामपूर ते देवखेरकी-नारदखेरकी हा रस्ता कित्येक वर्षे दुरूस्तीच्या प्रतिक्षेत आहे. प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेतून साडेसात कि.मी.च्या रस्त्यासाठी सुमारे ५ कोटीचा हा रस्ता मंजूर झाला.या रस्त्याचे काम महाराष्ट्र ग्रामीण रस्ते विकास संस्था उपअभियंता चिपळूण यांच्या देखरेखीखाली सुरू आहे. असे असताना या रस्त्याचे काम सुरू करताना सुरूवातीला डांबरीचा कोट न देता त्यावर खडी व ग्रीट टाकून रस्त्याचे काम सुरू केले.www.konkantoday.com




