
माजी मुख्यमंत्री, खा. नारायण राणे यांनी नाणार बाबत रोखठोक भूमिका जाहीर केल्याने प्रकल्प समर्थक, स्थानिक शेतकरी, ग्रामस्थांच्या लढ्याला बळ
माजी मुख्यमंत्री, खा. नारायण राणे यांनी नाणार होणारच अशी आपली रोखठोक भूमिका जाहीर केल्याने प्रकल्प समर्थक, स्थानिक शेतकरी, ग्रामस्थांच्या लढ्याला बळ मिळाले आहे. या प्रकल्पाचे समर्थन दिवसेंदिवस वाढत असून राणे यांनी जाहीर केलेल्या भूमिकेमुळे रिफायनरी प्रकल्प राजापूर तालुक्यातच होईल याची खात्री पटली आहे. त्यामुळे केंद्र शासनाच्या माध्यमातून रिफायनरी प्रकल्प लवकरात लवकर मार्गी लावावा यासाठी रिफायनरी प्रकल्प समर्थक समन्वय समिती व फार्ड रत्नागिरी यांच्यावतीने खा. नारायण राणे यांची भेट घेणार असल्याची माहिती रिफायनरी प्रकल्प समर्थक समन्वय समितीचे अध्यक्ष ऍड. शशिकांत सुतार यांनी दिली.
www.konkantoday.com