
पाटपन्हाळे विविध कार्यकारी सोसायटीच्या गोदामात खताच्या गोणी बरोबर मोठा अजगर सापडल्याने खळबळ
गुहागर तालुक्यातील पाटपन्हाळे विविध कार्यकारी सोसायटीच्या गोदामात खताच्या साठा केला आहे मात्र या गोदामात गोणींमध्ये एक महाकाय अजगर आढळून आल्याने कर्मचाऱ्यांमध्ये एकच गोंधळ उडाला. गोणींमध्ये वेटोळे घालून बसलेल्या या अजगराला शृंगारतळी येथील सर्पमित्र अरमान मुजावर यांनी पकडून त्याला नैसर्गिक अधिवासात सुरक्षितपणे सोडून जीवदान दिले.
पाटपन्हाळे विविध कार्यकारी सोसायटीचे या गोदामात खताच्या गोणी ठेवल्या आहेत. या खताचे वितरण करण्यासाठी कर्मचारी विनायक जोशी, सचिन कदम आणि प्रमोद चव्हाण हे गोदामातील गोणी बाहेर काढण्यासाठी गेले होते. गोणी बाजूला करत असताना त्यांना सुमारे सहा फुटांचा एक अजगर वेटोळे घालून बसलेला दिसला.
अजगराला पाहताच कर्मचाऱ्यांनी तात्काळ शृंगारतळी येथील सर्पमित्र अरमान मुजावर यांना बोलावले. मुजावर यांनी अत्यंत कौशल्याने आणि सुरक्षितपणे या अजगराला पकडले. त्यानंतर त्यांनी या अजगराला त्याच्या नैसर्गिकअधिवासात सुरक्षितपणे सोडून देण्यात आले