खेडमध्ये पतसंस्थेतील गैरव्यवहारामुळे शामराव पतसंस्थेविरोधात ठेवीदार आक्रमक.

खेड येथील शामराव नागरी सहकारी पतसंस्थेतील कोट्यवधी रुपयांच्या गैरव्यवहारामुळे ठेवीदारांमध्ये तीव्र संताप उसळला असून सहाय्यक निबंधक सहकारी संस्था कार्यालयासमोर आमरण उपोषणाला सुरूवात करण्यात आली आहे. गेल्या वर्षभरापासून ठेवीदारांना आपले पैसे मिळत नसल्याने अखेर शेकडो ठेवीदारांनी आंदोलनाचा मार्ग अवलंबला आहे.मंगळवार दि. १ जुलै २०२५ पासून हे आमरण उपोषण सुरू झाले असून आज दुसर्‍या दिवशी देखील सुभाष झोरे (पिग्मी एजंट) यांच्यासह अनेक ठेवीदार आंदोलनास ठामपणे बसले आहेत. झोरे यांनी ७० ते ८० लाख रुपये जनतेकडून गोळा करून पतसंस्थेकडे जमा केले होते.

मात्र त्यांचे व ठेवीदारांचे पैसे आजतागायत परत मिळालेले नाहीत. शामराव सहकारी पतसंस्थेतील गैरव्यवहारांची चौकशी सहकारी विभागाकडून सुरू असल्याचा दावा करण्यात आला आहे. मात्र चौकशीस विलंब होत असल्याचे ठेवीदारांचे म्हणणे आहे. या प्रकरणात पतसंस्थेचे संचालक व अधिकारी जबाबदार असल्याचा ठपका ठेवत ठेवीदारांनी कायदेशीर कारवाईची मागणी केली आहे.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button