
अखेर कराड मार्गावरील बंद बसफेर्या पूर्ववत, चिपळूण आगारप्रमुखांची माहिती.
कराड-चिपळूण महामार्ग रस्ता दुरूस्तीच्या कामामुळे येथील बसस्थानकातून कराडमार्गे मार्गस्थ होणार्या सर्व बसफेर्यांना ब्रेक लागणार होता. या बंदावस्थेतील सर्व बसफेर्या पूर्ववत झाल्याची माहिती आगारप्रमुख रणजित राजेशिर्के यांनी दिली. या मार्गे धावणार्या बसफेर्या बंद झाल्याने प्रवाशांना पर्यायी मार्गाचा अवलंब करावा लागला होता. यामुळे मनस्तापाला सामोरे जावे लागले होते या मार्गे धावणार्या सर्व बसफेर्या वाहतुकीसाठी पूर्ववत झाल्याने प्रवाशांना दिलासा मिळाला आहे.www.konkantoday.com