
विसापूरमधील साग तोडीवर गुहागर वनविभागाची कारवाई, तोडलेले साग जप्त.
गुहागर-विसापूर येथे सोमवारी झालेल्या सागाच्या तोडीवर गुहागर वनविभागाने कारवाई करून एकूण ४२३१ घनमीटर लाकडाचे ८५ नग जप्त केले. विसापूर येथील जमीनमालक अजिजा अब्दुल करिम मणियार यांच्या जागेतील साग प्रजातीचे एकूण ७ वृक्ष व त्याचे २५ नग आणि सईद मणियार यांच्या जागेतील एकूण ९ वृक्ष व त्याचे ६० नग असे मिळून ८५ नग जागेवरच जप्त करण्यात आले. या प्रकरणी तोड करणारे समीर युनूस सय्यद (चिपळूण) यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती गुहागर वनविभागाने दिली.www.konkantoday.com