लांजा तालुक्यातील गवाणे येथे फासकीत अडकलेल्या बिबट्याची वन विभागाकडून सुखरूप सुटका


गवाणे (ता. लांजा) येथे आज (३ जुलै) सकाळी काजू बागेत फासकीत अडकलेल्या बिबट्याची सुखरूप सुटका करून नैसर्गिक अधिवासात सोडण्यात वन विभागाला यश आले आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी : आज (३ जुलै) सकाळी गवाणे येथील रहिवासी असलेले गणू बाबू करंबळे यांच्या मालकीच्या काजू बागेमध्ये बिबट फासकीमध्ये अडकल्याची माहिती सुरेश तानाजी करंबळे (रा. गवाणे) यांनी भ्रमणध्वनीद्वारे वन विभागाला दिली. त्यानुसार तात्काळ वन विभागाचे अधिकारी व कर्मचारी यांनी जागेवर जाऊन पाहणी केली. त्यानंतर बिबट्या वन्य प्राण्याला लोखंडी पिंजऱ्यामध्ये सुरक्षितरित्या घेतले आणि त्याची लांजा पशुवैद्यकीय अधिकारी यांच्याकडून तपासणी करून घेतली. हा बिबट्या नर जातीचा असून अंदाजे दोन वर्ष वयाचा आहे. वैद्यकीय तपासणीनंतर तो सुस्थितीत असल्याची खात्री करून त्यास नैसर्गिक अधिवासात मुक्त करण्यात आले.
ही कार्यवाही ही विभागीय वन अधिकारी (प्रा.) रत्नागिरी (चिपळूण) श्रीमती गिरीजा देसाई, सहाय्यक वनसंरक्षक (प्रा.) रत्नागिरी (चिपळूण) श्रीमती प्रियंका लगड यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी रत्नागिरी प्रकाश सुतार, वनपरिक्षेत्र अधिकारी सामाजिक वनीकरण (राजापूर) राजेंद्र पाटील, वनपाल (पाली) न्हानू गावडे, वनपाल सामाजिक वनीकरण (लांजा) महादेव पाटील, वनरक्षक (राजापूर) विक्रम कुंभार, वनरक्षक सामाजिक वनीकरण (लांजा) बाबासाहेब ढेकळे, वनरक्षक (कोरले) श्रावणी पवार, वनरक्षक (लांजा) नमिता कांबळे, वनरक्षक सामाजिक वनीकरण (लांजा) सिद्धार्थ हिमगिरे, वन मजूर व रेस्क्यू टीमचे चंद्रकांत रामाणे, प्राणी मित्र दीपक कदम, मंगेश महेश लांजेकर, मयुरेश आंबेकर, मंगेश आंबेकर व गवाणे गावचे इतर ग्रामस्थ यांनी पार पडली.
अशा प्रकारच्या घटना घडल्यास वन विभागाचा टोल फ्री क्रमांक १९२६ किंवा ९४२१७४१३३५ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन वन विभागाच्या वतीने विभागीय वन अधिकारी गिरीजा देसाई यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button