
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील चिपळूण शहरात रखडलेल्या उड्डाणपुलावर पाच वर्षांनी पडला स्लॅब.
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर दीर्घकाळ रखडलेल्या चिपळूणच्या उड्डाणपुलावर सोमवारी कंत्राटदार कंपनीकडून पहिला स्लॅब टाकण्यात आला आहे. जुलै महिन्यात एकूण २४ मीटर लांबीचा स्लॅबचे काम पूर्ण करण्याच्या दृष्टीने नियोजन करण्यात आले असून मार्च २०२६ पर्यंत पूल वाहतुकीस खुला केला जाईल, असे महामार्ग कंत्राटदार ईगल इन्फ्रा कंपनी व्यवस्थापनाकडून सांगण्यात आले.मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणात पेढे परशुराम ते खेरशेत या ३४ किलोमीटरच्या चिपळूण टप्प्यात बहादूरशेख नाका ते प्रांत कार्यालयापर्यंत १,८४० मीटरचा उड्डाणपूल उभारण्यात येत आहे.www.konkantoday.com