
दापोली तालुक्यातील पालगड येथील सानेगुरूजी स्मारकाकडे जाणार्या रस्त्याची अवस्था बिकट.
दापोली तालुक्यातील पालगड येथील पूज्य सानेगुरूजी यांच्या स्मारकाकडे जाणार्या रस्त्याची अवस्था बिकट झाली असून यामुळे तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. यामुळे साने गुरूजींच्या स्मारकाला भेट देणार्या पर्यटक, अभ्यासकांना त्रास सहन करावा लागत आहे.पूज्य सानेगुरूजींचे गाव म्हणून पालगड गावाकडे पाहिले जाते. अनेक पर्यटक, अभ्यासक अनेकवेळा सानेगुरूजींच्या स्मारकाला भेट देतात. मात्र सानेगुरूजींच्या स्मारकाकडे जाणार्या रस्त्याची चाळण झाली आहे. यामुळे या मार्गावरून प्रवास करताना वाहनचालकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. यामुळे नागरिकांतून तीव्र संताप व्यक्त करण्यात येवून किमान या रस्त्यावरील खड्डे तरी बुजवावेत, अशी मागणी होत आहे.www.konkantoday.com