
चिपळुणात गुहागर बायपास रस्त्यावर ट्रेलर अडकल्यामुळे काही काळ वाहतूक ठप्प.
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग आणि गुहागर बायपास मार्गाला जोडणारा भाग वाहतुकीसाठी अतिशय धोकादायक ठरत आहे. महामार्गाची उंची अधिक असल्याने मोठ्या चढामध्ये ट्रेलर अडकण्याचे प्रकार सातत्याने घडत आहेत. मंगळवारी सायंकाळीही गुहागरच्या दिशेवरून मुंबई-भिवंडीकडे एक मोठा पोकलेन घेवून जाणारा ट्रेलर या परिसरात अडकून पडला. यामुळे महामार्गावरची वाहतूक तब्बल अर्धा तास विस्कळीत झाली होती.www.konkantoday.com