
गोवा – पुणे विमानाच्या खिडकीची फ्रेम निखळली
गोवा – पुणे फ्लाईटचा एक व्हिडिओ सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. स्पाईस जेट कंपनीच्या विमानाच्या खिडकीची फ्रेम विमान हवेतच असताना निखळली. या घटनेचा व्हिडिओ एकाने सोशल मिडियावर शेअर केला असून, हा विषय चर्चेचा विषय ठरला आहे.गोव्यातून पुण्याला जाणाऱ्या स्पाईज जेट कंपनीच्या एसजी-१०८० या विमानाने गोव्यातून उड्डाण घेतले. उड्डाण घेतल्यानंतर विमानातील खिडकीची फ्रेम अचानक निखळली यामुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. एका प्रवाशाने या घटनेचा व्हिडिओ एक्स या सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवर शेअर केला आहे.”क्यु ४०० या फ्लाईटच्या खिडकीची फ्रेम अचानक उघडली. यामुळे उड्डाणात फ्लाईट तसेच प्रवाशांना कोणताही धोका निर्माण झाला नाही. निखळलेला भाग विमानाच्या मुख्य डिझाईनचा भाग नाही. ही फ्रेम मुख्य खिडकीला जोडलेली असते, यामुळे फ्लाईट आणि प्रवाशांच्या सुरक्षेला कोणताही धोका होत नाही, असे कंपनीने स्पष्ट केले आहे.