स्वरूपानंद पतसंस्थेचा ठेव वृद्धीमास २० जून पासून सुरू झाला असून पहिल्या १२ दिवसात १० कोटी ९३ लाखांच्या ठेवी संस्थेकडे संकलित झाल्या. ६५८ ठेवीदार सभासदांनी स्वरूपानंदच्या ठेव योजनांमध्ये १० कोटी ९३ लाखांची गुंतवणूक केली आहे. २० जुलै पर्यंत २० कोटींचा ठेव टप्पा पूर्ण होईल असा विश्वास वाटतो, असे ॲड. दीपक पटवर्धन म्हणाले.
स्वरूपानंदकडील एकूण ठेवी रु. ३६१ इतक्या झाल्या असून ठेव वृद्धीमासाच्या अखेरपर्यंत संस्थेच्या ठेवी ३७५ कोटींच्या आसपास पोहोचतील असे प्रयत्न सुरू आहेत. ठेववृद्धी मासाला प्राप्त होणारा प्रतिसाद संस्थेची अग्रनामांकित स्थिती अधोरेखित करणारा आहे. ठेववृद्धीमासात ठेवीदार मोठ्या आत्मीयतेने संस्थेमध्ये येतात व आपली ठेव ठेवतात. ठेवीदारांचा हा विश्वास, ही आपुलकी आणि ठेवलेली ठेव संस्थेसाठी अनमोल असून "विश्वासार्ह आर्थिक सेवा, सुरक्षित आर्थिक सेवा" हे संस्थेचे ब्रीदवाक्य आहे, असे ॲड. पटवर्धन म्हणाले.
स्वरूपानंदच्या ठेव वृद्धीमासासाठी विशेष ठेव दर संस्थेने घोषित केले आहेत. ९% दराच्याही ठेव योजना अटींसह घोषित केल्या आहेत. या विविध ठेव योजनांमध्ये रक्कम गुंतवून ठेवीदारांनी स्वरूपानंदच्या अर्थविश्वात सहभागी व्हावे असे आवाहन ॲड. दीपक पटवर्धन यांनी केले आहे.