
रत्नागिरी जिल्ह्यात टीबीमुक्त अभियान सुरू.
रत्नागिरी जिल्हा टीबीमुक्त व्हावा, यासाठी क्षयरोग विभागाच्यावतीने विविध उपाययोजना करण्यात येत आहे. जिल्ह्यात दि. १ जुलै ते ३१ डिसेंबरपर्यंत टीबीमुक्त भारत अभियान राबविण्यात येणार आहे. त्यासाठी ३७६ उपकेंद्रांची टीम, १४०१ आशा वर्कर व विविध कर्मचारी घरोघरी सर्व्हे करणार आहेत.रत्नागिरी जिल्ह्यात २०१५ साली मोठ्या प्रमाणात क्षयरोगाचे रुग्ण आढळले होते. त्यानंतर जिल्ह्यात जनजागृती करण्यात आली. त्यामुळे नागरिकांनी स्वतःहून इलाज करण्यास सुरुवात झाली. त्यामुळे २०२५ पर्यंत संख्या ३८ टक्क्यांनी कमी झाली आहे. जिल्हा शंभर टक्के टीबीमुक्त व्हावा यासाठी विभाग काम करीत आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०२५ पर्यंत टीबीमुक्त भारत करू असा संकल्प केला आहे. त्यामुळे जिल्ह्यासह राज्यभरात अभियान, जनजागृती सुरू आहे. रत्नागिरी जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या सीईओ वैदेही रानडे, आरोग्य अधिकारी अनिरुद्ध आठल्ये, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. महेंद्र गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली दि. १ जुलै ते ३१ डिसेंबरपर्यंत टीबीमुक्त भारत अभियान सुरू करणार आहेत.www.konkantoday.com