
भाजपने घेतलेल्या वर्षभराच्या मेहनतीमुळे रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघात ४५ वर्षानी कमळ फुलले -बाळासाहेब माने
रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघामध्ये भाजपचे कमळ ४५ वर्षांनंतर कमळ फुलले त्याबद्दल खूप आनंद होत आहे. भाजपचे मतदार, नवमतदार, महिला मतदार व योजनांच्या लाभार्थ्यांनी भाजपला निवडून दिले आहे. या निमित्ताने कोकण विकासाला नवा आयाम मिळणार आहे, अशी प्रतिक्रिया भाजपचे माजी आमदार, लोकसभा सहप्रभारी बाळासाहेब माने यांनी व्यक्त केला.केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी लोकसभा निवडणुकीत विजय मिळविल्यानंतर बाळासाहेब माने यांनी सांगितले की, केंद्रीय नेतृत्वाने केलेली व्यूहरचना, दिग्गज नेते नारायणराव राणे यांना दिलेले तिकिट, तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, भाजप कार्यकर्ते, लोकप्रतिनिधी, निलेश राणे, आमदार नितेश राणे, अतुल काळसेकर, राजन तेली, प्रमोद जठार, मंत्री रविंद्र चव्हाण, भाजप जिल्हाध्यक्ष राजेश सावंत आणि जिल्हा पदाधिकारी, सर्व तालुकाध्यक्ष, सर्व आघाड्यांचे प्रमुख यांनी केलेली मेहनत यामुळे भाजपने ही निवडणूक जिंकली आहे.www.konkantoday.com