
ग्रामीण जगृती कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत कोळंबे येथे कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्राचे उद्घाटन.
डॉ. बळासाहेब सावंत कोकणा कृषि विद्यापीठ अधिनस्त कृषि महाविद्यालय, दापोली तफे रत्नागिरींमधील कोळंबे गावात कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्राची स्थापना करण्यात आली. सदरच्या माहिती केंद्राची स्थापना चतुर्थ वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या “मृदासूत” गटामार्फत ग्रामीण जागृती कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत करण्यात आली आहे.शेतकऱ्यांना आधुनिक व शाश्वत शेतीविषयक माहिती देण्यासाठी कोळंबे गावात कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्राची स्थापना करण्यात आली असून, याचे उद्घाटन रत्नागिरी जिल्ह्याचे अधिक्षक कृषि अधिकारी श्री. शिवकुमार सदाफुले आणि ग्रामपंचायत कोळंबेचे सरपंच श्री. प्रशांत पाटील यांच्या हस्ते झाले.
या कार्यक्रमास आत्मा प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी श्री. विजय बेटिवर, जिल्हा कृषि अधिकारी (सामान्य), जिल्हा परिषद रत्नागिरी श्री. विजय मुळे, वर्तुळ कृषि अधिकारी (पावस) श्री. सागर मिसाळ, कृषि विकास अधिकारी (पंचायत समिती, रत्नागिरी) श्री. गडदे, उपसरपंच(ग्रामपंचायत, कोळंबे) श्री रवींद्र भताडे, सहाय्यक कृषि अधिकारी श्री. दीपक काळे आणि शेतकऱ्यांची उपस्थिती लाभली.हे माहिती केंद्र डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठ, दापोली अंतर्गत कृषि महाविद्यालय, दापोली येथील ग्रामीण जागृती कार्यनुभव कार्यक्रमांतर्गत विद्यार्थ्यांनी उभारले आहे. शेतकऱ्यांना शेतीसंबंधी महत्त्वपूर्ण माहिती एका ठिकाणी उपलब्ध व्हावी या उद्देशाने या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली आहे.माहिती केंद्रामध्ये कोकण विभागातील पिकांच्या सुधारित वाणांची माहिती, सेंद्रिय शेती, कीड व रोग व्यवस्थापन, खत व्यवस्थापन, जैविक खते, जैव नियंत्रक, हवामान अंदाज, विद्यापीठाचे प्रकाशन व विविध कृषी योजना यांची माहिती उपलब्ध करून देण्यात आली आहे.या उपक्रमात स्थानिक शेतकरी श्री. प्रशांत फडणीस आणि श्री. अजित हातिसकर यांनी मोलाचे सहकार्य केले. प्रमुख पाहुण्यांनी या माहिती केंद्राचे कौतुक करताना असे उपक्रम ग्रामीण भागात शेतीचा विकास साधण्यास निश्चितच उपयुक्त ठरतील, असा विश्वास व्यक्त केला. शेतकऱ्यांनी अधिकाधिक प्रमाणात या केंद्राचा लाभ घ्यावा, असे आवाहन या वेळी करण्यात आले.या उपक्रमासाठी कृषि महाविद्यालय, दापोलीचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. मकरंद जोशी, प्रादेशिक नारळ संशोधन केंद्र, भाट्येचे केंद्रप्रमुख डॉ. किरण मालशे, विषय विशेषज्ञ डॉ. रंजीत महाडीक आणि कार्यक्रम अधिकारी डॉ. संतोष वानखेडे यांचे मार्गदर्शन लाभले.ह्या उपक्रमात प्रणव देसाई, विजय दराडे, विपुल डोंगरकर, ओंकार फराडे, राजवर्धन गायकवाड, सुमित भादवे, वेदांत गिरी, सार्थक दिवाळे, आकाश गावडे आणि संकेत देशपांडे ह्या विद्यार्थ्यांचा सहभाग होता.कोळंबे गावातील हा स्तुत्या उपक्रम इतर गावां साठीही प्रेरणादायी ठरेल.“मृदासूत” गटामार्फत ह्यापुढील चार महिने अश्यातरेचे विविध उपक्रम आणि आधुनिक कृषि तंत्रज्ञानावर आधारित प्रात्यक्षिकं राबविण्यात येणार आहेत.