
हैदराबाद येथील राष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धेत युवा संघाला तीन रौप्य पदके.
तायक्वांदो फेडरेशन ऑफ इंडिया यांच्यावतीने तेलंगणा तायक्वांदो असोसिएशन आयोजित खुल्या तायक्वांदो राष्ट्रीय स्पर्धा 2025 बालयोगी स्टेडियम गाच्चीबोली हैदराबाद तेलंगणा येथे दिनांक 25 ते 27 जून 2025 या कालावधीत पार पडले सदर खुली राष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धेकरिता रत्नागिरी तायक्वांडो स्पोर्ट्स असोसिएशन यांच्या अधिकृत संलग्न असलेले युवा मार्शल आर्ट तायक्वांडो ट्रेनिंग सेंटर रत्नागिरी संलग्न नेहरू युवा केंद्र रत्नागिरी (भारत सरकार) ओम साई मित्र मंडळ साळवी स्टॉप नाचणे येथील सभागृहात प्रशिक्षण घेणारे मयुरी मिलिंद कदम गुरुप्रसाद मिलिंद सावंत, उपर्जना राम कररा , रुही राम कररा यांनी सहभाग घेतला होता सदर राष्ट्रीय स्पर्धेत ल.ग पटवर्धन प्राथमिक विद्यालय माळनाका येथे दुसरी सोनचाफा इयत्तेत शिक्षण घेणारी कु .रुही राम कररा हिने फाइट स्पर्धेत रौप्य पदक तर मयुरी मिलिंद कदम हिने फुमसे प्रकारात रौप्य पदक व फाईट स्पर्धेत रौप्य पदक संपादन करून रत्नागिरी जिल्ह्याचे नाव राष्ट्रीय पातळीवर चमकवली मयुरी हिने यापूर्वी आंतरराष्ट्रीय तायक्वांडो स्पर्धेत रत्नागिरी जिल्ह्यात पहिले रौप्य पदक पटकावले होते याचे सदर राष्ट्रीय स्पर्धेचे प्रशिक्षक म्हणून महिला प्रशिक्षिका सौ. शशीरेखा कररा यांनी काम पाहिलेयशस्वी दोन्ही खेळाडूंना प्रशिक्षक राम कररा यांचे मार्गदर्शन लाभले