
सिंधुदुर्गातील प्रसिद्ध कलाकार अल्पेश घारे याने विराट काेहलीचे तब्बल 15 फूट उंचीचे भव्य चित्र निवती समुद्रकिनारी साकारले.
सिंधुदुर्गातील कुडाळ-पाट परिसरातील सुप्रसिद्ध चित्रकार अल्पेश घारे यांनी भारतीय क्रिकेट संघाचा स्टार फलंदाज विराट काेहली याचे तब्बल 15 ूट उंचीचे भव्य चित्र निवती समुद्रकिनारी साकारले असून, ही कलाकृती पर्यटकांसाठी आकर्षण ठरत आहे.अल्पेश यांनी हे चित्र रांगाेळी आणि कलर स्प्रेच्या माध्यमातून रेखाटले आहे. विशेष म्हणजे पावसाळ्याच्या प्रतिकूल हवामानातही त्यांनी केवळ दीड तासांत ही अद्वितीय कलाकृती पूर्ण केली. जाेरदार वारे आणि पावसाच्या सरी यावर मात करत त्यांनी ही कलाकृती साकारली, यामध्ये त्यांना विठ्ठल माधव, भावेश घारे आणि मंजिरी घारे या मित्रमंडळींची माेलाची साथ लाभली.अल्पेश यांना लहानपणापासूनच चित्रकलेची गाेडी असून, त्यांचे प्राथमिक शिक्षण पाट हायस्कूल येथे झाले. शालेय जीवनातच त्यांनी राज्यस्तरीय चित्रकला स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवला आहे. कलाशिक्षक संदीप साळसकर यांच्या मार्गदर्शनाखाली विविध कलाप्रदर्शनांतही त्यांनी सहभाग घेतला आहे.www.konkantoday.com