
रोटरी क्लब ऑफ रत्नागिरी मिडटाउन च्या अध्यक्ष पदी 2025-26 साठी डॉ.सौ. स्वप्ना करे यांची निवड.
रोटरी क्लब ऑफ रत्नागिरी मिडटाउन चा 20 वा पदग्रहण सोहळा रविवार दिनांक 29 जून रोजी हॉटेल संगम रेसिडेन्सी च्या प्रशास्त हॉल मध्ये मोठ्या दिमाखात पार पडला.रोटरी वर्ष 1 जुलै 25 ते 30 जून 26 या कालावधीकरिता नवीन कार्यक्रणीची निवड करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे व इंस्टॉलेशन ऑफिसर रोटेरिअन श्री. नाईक यांनी रोटेरिअन डॉ. सौ. स्वप्ना करें यांना कॉलर प्रदान करून पुढील रोटरी वर्षाची सूत्रे त्यांचेकडे सोपवली. क्लब चे सेक्रेटरी म्हणून रोटेरिअन श्री. राजेंद्र कदम तर खजिनदार म्हणून श्री. सीताराम सावंत यांची नियुक्ती करून त्यांना पिन प्रदान केली.त्याआधी मागील वर्षीचे प्रेसिडेंट श्री. हिराकांत साळवी यांनी आपले मनोगत व्यक्त करताना मागील वर्षात अनेक आव्हाने आणि अडचणींचा सामना करून आपल्या कारकिर्दीत केलेल्या कामांचा आढावा घेतला. सेक्रेटरी रोटेरिअन श्री. संदीप करे यांनी गेल्या वर्षभरात केलेल्या कार्यक्रमाचा पिपिटी प्रेझेटेशन करून सविस्तर माहिती दिली. प्रमुख पाहुणे आणि इंस्टॉलेशन ऑफिसर रोटेरिअन श्री. अशोक जी नाईक यांनी त्यांच्या अध्यक्षीय भाषणात रोटरी ची माहिती, कार्यपद्धती आणि समाजासाठी योगदान याबाबत थोडक्यात माहिती दिली. ग्लोबल किंवा CSR ग्रांट मधून लोकोपयोगी प्रोजेक्ट्स कसे करावेत याबाबत मार्गदर्शन केले. क्लब च्या नवीन कार्यकारणी ला शुभेच्छा देऊन पुढील वर्षात भरीव कामगिरी ची अपेक्षा व्यक्त केली.सोबत इनर व्हील क्लब ऑफ रत्नागिरी मिडटाउन च्या नवीन कार्क्रमचा पदग्रहण सोहळा रोटेरिअन श्री. अशोकजी नाईक यांच्या उपस्थितीत पार पडला. इनर व्हील अध्यक्षा म्हणू सौ. ऋचा गांधी, सेक्रेटरी म्हणून सौ. चौधरी तर खजिनदार म्हणून सौ. श्रद्धा सावंत यांची निवड करण्यात आली. इनर व्हील क्लब च्या पहिल्या चार्टर अध्यक्षा सौ. स्वप्ना करे यांनी त्यांच्या कामाचा आढावा घेताना मागील वर्षात घेतलेले कार्यक्रम, त्यामध्ये मेंबर्स चा मिळालेला सहभाग आणि लोकांचा लक्षनीय प्रतिसाद यासाठी सर्वांचे आभार व्यक्त करून असच प्रतिसाद यापुढेहि मिळावा अशी अशा व्यक्त केली. इनर व्हील मध्ये काम करत असताना कुटीबीयांकडून मिळालेले सहकार्य आणि प्रोत्साहन खूप मोलाचे असल्याचे सांगुन केवळ त्यामुळेच त्या यशस्वी होऊ शकल्या अशी कृतज्ञता व्यक्त केली.या कार्यक्रमदरम्यान नवीन रोटेरिअन्स आणि इनर व्हील मेंबर्स ना पिन प्रदान करून रोटरी आणि इनर व्हील क्लब मध्ये सामावून घेतले.कार्यक्रमा दरम्यान समाजात किंवा वैयक्तिक जीवनात ज्यांनी उत्कृष्ट काम केले आहे अशा व्यक्तींचा मान्यवारांच्या हस्ते हौरव करण्यात आला. श्री. प्रसाद देवस्थळी ज्यांनी कोकण कोस्टल हाल्फ मॅरेथॉन ची रत्नागिरीत सुरवात केली आणि स्पोर्ट्स टुरिसम ची नवीन संकल्पना रुजवली त्यांचा श्री. अशोकजी नाईक यांच्या हासे शाळा, श्रीफळ आणि सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. तसेच प्रतिकूल परिस्थितीवर मत करून वकील झालेल्या पत्रकार राजन चव्हाण यांचा देखील सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमासाठी मोठ्या प्रमाणात रोटरी आणि इनरव्हील क्लब मेंबर्स चे कुटुंबीय आणि मित्रपरिवार उपस्थित होता. रोटरी क्लब ऑफ रत्नागिरी चे अनेक पदाधिकारी आणि वरिष्ठ रोटेरिअन्स आवर्जून उपस्थित राहिले आणि त्यांनी रोटरी क्लब आणि इनरव्हील क्लब च्या नवीन टीम ला शुभेच्छा दिल्या. रत्नागिरी रोटरी क्लब चे श्री. श्रीकांत भुर्के के यावर्षी असिटंट गव्हर्नर म्हणून काम पाहत आहेत त्यांनी मार्गदर्शन करताना सदैव सहकार्य आणि मदत करण्याचे आश्वासन दिले.राष्ट्रगीताने कार्यक्रमांची सांगता झाली.