
रत्नागिरी जिल्ह्यात पंढपूरआषाढी वारीनिमित्त २३ एसटी गाड्या आरक्षित.
लाखो वारकरी, भाविक आषाढी वारीनिमित्त दरवर्षी पंढरपूरला लाडक्या विठुरायाच्या दर्शनासाठी जातात. अनेक भाविक, वारकरी पायी पंढरपूरच्या दिशेने रवाना झाले आहेत. उर्वरित भाविक, वारकरी हे एसटी, रेल्वेने जातात. यासाठी जिल्ह्यातून एसटी विभागानेही गाड्यांचे नियोजन केले आहे. आतापर्यंत २३ एसटी गाड्यांचे आरक्षण झाले आहे. ३ जुलै ला रत्नागिरीसह विविध आगारातून एसटी बस पंढरपूरला रवाना होणार आहे.
अजून काही दिवस असल्याने भाविकांनी जास्तीत जास्त आरक्षण करावे, असे आवाहन एसटी विभागाच्या वतीने केले आहे.आषाढी वारी काहीच दिवसांवर येवून ठेपली आहे. त्यामुळे काही वारकरी, भाविक उन्ह, वारा, अंगावर पावसाच्या सरी झेलत पायी जाण्यासाठी निघाले आहेत. विठुनामाचा गजर करीत लाखो वारकरी पायी पंढरपूरच्या दिशेने निघाले आहेत. वारकरी, भाविकांचा प्रवास सुखकर व्हावा, यासाठी जिल्ह्यातून आतापर्यंत २२ एसटी बस आरक्षित करण्यात आल्या आहेत. अजून काही दिवस शिल्लक असून ३० ते ३५ गाड्या बुकिंग होण्याची शक्यता आहे. मागील वर्षी ३० एसटी बसेस पंढरपूरला धावल्या होत्या. उर्वरित भाविकांना पंढरपूरला जायचे असेल तर आताच एसटी आरक्षण करावे, असेही आवाहन करण्यात आले.