रत्नदुर्ग किल्ल्याच्या पाॅईंटवरून काेसळलेल्या तरूणीचा अद्यापही शाेध लागलेला नाही.


रत्नागिरी शहरातील प्रसिद्ध भगवती किल्ल्याजवळ रविवारी एका तरूणी खाली काेसळली. तिचा अद्यापही शाेध लागलेला नाही. मात्र ही महिला खाली पडली असावी असा अंदाज हाेता परंतु तिचे चप्पल त्या ठिकाणी मिळाल्याने हा आत्महत्येचा प्रकार आहे की काय या दृष्टीने तपास सुरू आहे. रविवारी दुपारी 12.30 वाजण्याच्या सुमारास एक 23 ते 25 वयाेगटातील तरुणी खवळलेल्या समुद्रात काेसळून बेपत्ता झाल्याने माेठी खळबळ उडाली आहे. घटनास्थळी तरुणीची चप्पल आणि ओढणी आढळून आल्याने ही आत्महत्या आहे की सेल्ी काढताना ताेल जाऊन घडलेला अपघात, याबद्दल तर्कवितर्क लढवले जात आहेत. विशेष म्हणजे, ही तरुणी बेपत्ता असल्याची कुठेही अधिकृत नाेंद नसल्याने तिला शाेधणे पाेलिसांसाठी आव्हानात्मक बनले आहे.
रविवारची सुट्टी असल्याने भगवती किल्ल्याजवळील शिवसृष्टी पाहण्यासाठी स्थानिक आणि बाहेरून आलेल्या पर्यटकांनी माेठी गर्दी केली हाेती. त्यावेळी ही तरुणी रेलिंगच्या पुढे जाऊन सेल्ी काढण्यात मग्न असल्याचे समजते. सेल्ी काढताना तिने आपली चप्पल आणि र्स्काफ बाजूला काढून ठेवले हाेते. तिच्या आजूबाजूला इतर पर्यटक निसर्गाचा आनंद घेत असताना, काही क्षणात ती तरुणी अचानक सुमारे 200 ते 250 ूट खाेल समुद्राच्या पाण्यात पडल्याचे निदर्शनास आले.
दरम्याने घटनास्थळी पाेलीस व एनडीआरएफच्या पथकाला पाचारण करण्यात आले परंतु समुद्राला उधाण असल्यामुळे या तरूणीचा शाेध लागू शकलेला नाही. रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांनी घटनास्थळी भेट देवून अधिकाèयांना याेग्य त्या सूचना दिल्या तसेच पर्यटकांनी पावसाळ्यात धाेकादायक ठिकाणी जाण्याचे टाळावे असेही आवाहन सामंत यांनी केले.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button