मुंबई गोवा महामार्गावील उड्डानपुलाखालील बोगदे बनले पार्किंग झोन , अपघाताचा धोका.

राजापूर / –  मुंबई गोवा महामार्गावरील उभारण्यात आलेल्या उड्डाणपुलाखालून आजूबाजूच्या गावांसाठी काढण्यात आलेले पर्यायी मार्ग आणि काही ठिकाणचे बोगदे हे गेले काही महिने वाहनांसाठी पार्किंग झोन बनले आहेत. बऱ्याच वेळा तेथे प्रदीर्घकाळ उभ्या असलेल्या वाहनांच्या गर्दीमुळे तेथून ये जा करणाऱ्या वाहनांना अडथळे ठरत असून त्यातून अपघातांचे धोके वाढत असतानाच कायदा सुव्यवस्था मात्र त्याकडे जातीनिशी लक्ष देत नसल्याने सखेद आश्यर्य व्यक्त होत आहे.

मुंबई गोवा महामार्गावर राजापूर तालुक्याच्या कार्यक्षेत्रात वाटुळ पासुन पुढे येरडव फाटा ,ओणी बाजारपेठ ,राजापूर पेट्रोलपंप परीसर ,हातिवले आदी ठिकाणी  उड्डाण पूल बांधण्यात आले असून त्याखालून आजूबाजूच्या गावांकडे दैनंदिन रहदारीसाठी कायमस्वरूपी मार्ग काढण्यात आले आहेत.

मात्र त्या पुलांखाली बऱ्याच वेळा अनेक वाहने पार्क केली जात असून त्यामुळे वाहनांची मोठीं गर्दी तेथे पहायला मिळते.यामध्ये ओणीमधील पाचल ,येरडव फाट्यावर तर डंपर ,ट्र्क ,यासह सर्व प्रकारची वाहने तर प्रदिर्घकाळ पार्क केलेली पहावयास मिळतात. वाहनांच्या दुरुस्तीचा व्यवसाय देखील तेथे सुरु करण्यात आला आहे बऱ्याचवेळा तर काही मोठी वाहने तर एका रेषेत उभी असतात त्यामुळे महामार्गावरुन किंवा आजुबाजुच्या परीसरातुन आलेल्या वाहनान्ना अडथळे ठरत आहेत . बऱ्याच वेळा झपकन आलेल्या वाहनांची तेथे उभ्या असलेल्या वाहनांना धडक बसुन अपघात होण्याचा धोकादेखील असतो. यापुर्वी एकदोन वेळा असे प्रकार घडले होते . मात्र ते अपघात किरकोळ होते.सुदैवाने फारसे नुकसान झाले नव्हते .काही वाहने तर गेले अनेक दिवस मालकीचे क्षेत्र असल्या प्रमाणे पुलाखाली उभी आहेत त्या पुलाखाली वाहनांच्या दुरुस्तीचे काम देखील होते.त्यामुळे अलिकडे हा उड्डाणपुल म्हणजे विना परवाना वाहन तळच बनविण्यात आला आहे तसेच प्रकार राजापूर पेट्रोलपंपाजवळच्या उड्डाणपुलाखाली पहावयास मिळतो तेथे सुध्दा प्रदीर्घकाळ वाहने उभी असतात केवळ उड्डाणपुलच नाही तर जे पादचाऱ्यांसाठी बोगदे काढण्यात आले आहेत त्याचाही वापर दुचाकी गाड्या पार्किंगसाठी केला जात आहे त्यामुळे तेथुन वाट काढीत जावे लागते असे अनेकवेळा घडते.

महामार्गावरील उड्डाणपुलांसह काढलेल्या बोगद्यांचा वापर विनापरवाना वाहन तळासाठी होत असताना व वाहतुकीच्या दृष्टीने ते धोकादायक ठरत असताना त्या विरोधात कोणतीच कृती वा कारवाई होताना दिसत नाही त्यामुळे जनमानसातुन संताप व्यक्त केला जात आहे एखादा मोठा अपघात झाल्यानंतरच कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे का असे खडे सवाल उपस्थीत केले जात आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button