
बबनराव लोणीकरांच्या वक्तव्यावरुन नाना पटोले आक्रमक; दिवसभरासाठी निलंबन ______
भाजप आमदार बबनराव लोणीकर यांनी शेतकऱ्यांबाबत केलेल्या वक्तव्यावरुन विरोधक चांगलेच आक्रमक झाले. आज पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच हा मुद्दा चांगला तापला असून नाना पटोले यांनी बबनराव लोणीकर यांनी माफी मागावी अशी मागणी करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल असंसदीय शब्द वापरले, यामुळे त्यांचे विधिमंडळ कामकाजातून दिवसभरासाठी निलंबन करण्यात आले आहे.नाना पटोले यांनी “मोदी तुमचा बाप असेल शेतकऱ्यांचा नाही” म्हटले तसेच ते आक्रमक होत विधानसभा अध्यक्षांच्या आसनासमोर जाऊन उभे राहिले. कृषी दिनाच्या दिवशी बबनराव लोणीकर यांनी शेतकऱ्यांची माफी मागावी असा आक्रमक पवित्रा घेतला. नाना पटोले यांनी पंतप्रधान मोदींविषयी वक्तव्य केल्याने मुख्यमंत्र्यांनी नाराजी व्यक्त केली, यानंतर त्यांचे दिवसभरासाठी निलंबन करण्यात आले.
जे शेतकऱ्यांची चेष्टा करतात त्यांना मान सन्मान मिळतो, आणि जे शेतकऱ्यांचे प्रश्न मांडतात त्यांना निलंबित केला जातो. बबनराव लोणीकर आणि कृषीमंत्र्यांवर कारवाई नाही झाली आणि शेतकऱ्यांची माफी मागितली नाही तर आम्ही रोज निलंबित केले तर शेतकऱ्यांचे प्रश्न सभागृहात मांडत राहणार असे नाना पटोले यांनी माध्यामांशी बोलताना सांगितले.
ते म्हणाले की, शेतीला पैसे नाहीत, या सरकारने शेतकऱ्यांना बोनस दिलेला नाही, शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यासाठी हे सरकार तयार नाही. पिकविमा देखील बंद केला आहे. हे सरकार शेतकरी विरोधी आहे.
नाना पटोले म्हणाले की मी देखील विधानसभा अध्यक्ष होतो, मला नियम माहिती आहे, मी विधानसभा अध्यक्षांचा अपमान केलेला नाही. हे सरकार शेतकरी विरोधी आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे शेतकऱ्यांना मारण्यासाठीच निवडून आले आहेत असा गंभीर आरोप नाना पटोले यांनी यावेळी केला