
ग्रामदैवत श्रीदेव भैरी देवस्थानचा आषाढ महिन्यातील पालखी उत्सव व बळ कार्यक्रम.
*रत्नागिरी*- ग्रामदैवत श्रीदेव भैरी देवस्थानचा आषाढ महिन्यातील पालखी उत्सव व बळ कार्यक्रम पारंपारिक पध्दतीत खालीलप्रमाणे होणार आहे.
पहिली ग्रामप्रदक्षिणा शनिवार दि.०५ जूलै व दूसरी ग्रामप्रदक्षिणा, रविवार दि. २० जुलै २०२५ रोजी होणार आहे. सकाळी १० वाजता श्रीदेव भैरीची पालखी मंदिरातून ग्रामप्रदक्षिणेसाठी बाहेर पडेल. पालखी खालची आळी मार्गे मुरलीधर मंदिर, काँग्रेस भुवन, टिळक आळी, झाडगाव येथे पटवर्धन व सांवत (खोत यांच्याकडे थांबून पुढे जोशी पाळंद मार्गे परटवणे येथे खंडकर खोत यांच्याकडे थांबेल. त्यानंतर पुढे फगरवठार येथील लांजेकर कंपाऊंड मधील सहाणेवर थांबेल. पुढे अठरा हाताच्या गणपती मंदिर मार्गे फाटक हायस्कूल गाडीतळ, गोखले नाका, मारुती आळी, तेलीआळी कोतवडेकर सहाणेवर थांबून परत मारुती आळीतून प-याची आळी, धमालनीच्या पारावरून विठठल मंदिर मार्गे, मुरलीधर मंदिर, खालची आळी मार्गे रात्री १० वाजता पालखी श्री देव भैरी मंदिरामध्ये येईल व गा-हाणे होवून ग्रामपदक्षिणा कार्यक्रम संपेल.
बुधवार दि. ०९ जुलै २०२५ रोजी दु. १२ वाजता भैरीची बळ बाहेर पडणार आहे. वरील सर्व उत्सवामध्ये बारा वाडयातील सर्व गावकरी, मानकरी, ग्रामस्थ भाविकांनी सहभागी होण्याचे आवाहन श्री भैरी देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष रविंद्र तथा मुन्नाशेठ सुर्वे यांनी केले आहे.