गोव्याहून पंढरपूरसाठी विशेष रेल्वे सेवा सुरू


पंढरपूरच्या विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. आता गोव्यातून रेल्वेने थेट पंढरपूरला जाणे अधिक सोपे झाले आहे. दक्षिण-पश्चिम रेल्वेने कॅसल-रॉक येथून पंढरपूरसाठी विशेष रेल्वे सेवा सुरू केली आहे, ज्यामुळे भाविकांना मोठा दिलासा मिळणार आहे.रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, कॅसलरॉक-मिरज एक्सप्रेस (गाडी क्रमांक १७३३४) ही रेल्वे ४ ते ९ जुलै या कालावधीत तात्पुरत्या स्वरूपात पंढरपूरपर्यंत वाढवण्यात आली आहे.

या महत्त्वपूर्ण निर्णयामुळे गोव्यातून निघणाऱ्या भाविकांना आता थेट पंढरपूरला रेल्वेने पोहोचणे शक्य होणार आहे. विशेषतः आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय भाविकांसाठी अत्यंत सोयीचा ठरणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button