
मनसे नेते अविनाश जाधव यांना मध्यरात्री 3 वाजता पोलिसांनी ताब्यात घेतलं, मीरा-भाईंदरमधील मोर्चाआधी मोठी कारवाई!
मीरा-भाईंदरमधील* मराठी मोर्चाआधी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते आणि ठाणे-पालघरचे विभागप्रमुख अविनाश जाधव यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मध्यरात्री तीनच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली.
अमराठी व्यापाऱ्यांनी काढलेल्या मोर्चाला उत्तर म्हणून मीरा-भाईंदरमध्ये मंगळवारी सर्वपक्षीय मराठी मोर्चा निघणार होता. मात्र तत्पूर्वीच पोलिसांनी अविनाश जाधव यांच्यासह मनसे आणि इतर पक्षाच्या काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे.




