बिघडलेला नळपाणी योजनेचा पंप काढण्यासाठी विहिरीत उतरलेल्यातरुणाचा बुडून दुर्दैवी मृत्यू


खेडतालुक्यातील मुरडे येथे बिघडलेला नळपाणी योजनेचा पंप काढण्यासाठी विहिरीत उतरलेल्या विशाल सुधाकर चव्हाण (वय ४२, रा. चाकाळे-जगदीशनगर, खेड) या तरुणाचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाला.
नळपाणी योजनेचा पाण्याचा पंप बिघडल्याने एका ठेकेदाराने विशालला तो विहिरीतून बाहेर काढण्यासाठी बोलावले होते. त्यानुसार, विशाल खोल विहिरीत उतरला मात्र, विहिरीतील पाण्याची खोली आणि तळाचा अंदाज त्याला आला नाही आणि त्यातच त्याचा बुडून करुण अंत झाला.

या घटनेची माहिती मिळताच विसर्जन कट्टाचे अध्यक्ष संतोष शिंदे, सदस्य साहिल बुटाला, निखिल चौधरी, सागर आंजर्लेकर, मदत ग्रुपचे अध्यक्ष प्रसाद गांधी, तसेच नगरपरिषदेच्या अग्निशमन दलातील कर्मचारी सूरज शिगवण आणि जयेश पवार हे तातडीने घटनास्थळी दाखल झाले. गावकऱ्यांनाही माहिती मिळताच त्यांनी मोठी गर्दी केली. उपस्थित सर्व मदतकर्त्यांनी विहिरीत उतरून सुमारे एक तासाच्या अथक प्रयत्नांनंतर विशालचा मृतदेह बाहेर काढला.

मयत विशाल चव्हाण हा रोजंदारीवर मजुरीचे काम करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवत होता.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button