दुर्मीळ समुद्री पाहुणा मुखवटा असलेला बुबी पक्षी मुर्डी परिसरात सापडल्याची नोंद.

मुर्डी (ता. दापोली) समुद्र किनाऱ्यावर राहणाऱ्या नागरिकांना सध्या निसर्गाच्या नव्या भेटी अनुभवायला मिळत आहेत. याच अनुषंगाने नुकताच एक दुर्मीळ समुद्री पाहुणा मुखवटा असलेला बुबी Masked Booby पक्षी मुर्डी परिसरात सापडल्याची नोंद झाली असून, यशस्वी रेस्क्यू करून त्याला निसर्गाच्या सान्निध्यात परत सोडण्यात आले आहे.रविवारी २८ जून रोजी दुपारी मुर्डी येथील शेतकरी वैभव झगडे यांना त्यांच्या शेतामध्ये एक मोठा, बदकासारखा अज्ञात पक्षी थकलेला आणि अडचणीत आढळून आला. त्यांनी तत्काळ दापोली वनविभागाला याची माहिती दिली.सदर माहिती मिळताच वनविभाग आणि वाईल्ड अ‍ॅनिमल रेस्युअर या संस्थेचे जवळच असलेले प्रशिक्षित वन्यजीव रक्षक मनित बाईत आणि प्रतीक बाईत हे दोघेही काही वेळात घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पक्ष्याची शारीरिक अवस्था तपासली असता तो फारच थकलेला, पंख ओले आणि हालचाली अत्यंत मर्यादित अशा अवस्थेत आढळून आला. विशेष म्हणजे, हा पक्षी सर्वसामान्य पक्ष्यांपेक्षा वेगळ्या रचनेचा असून दापोली मध्ये नियमित आढळणाऱ्या पक्षांपेक्षा वेगळा होता.

हा पक्षी नियमित स्थलांतरित पक्षी नसून क्वचितच काही कारणास्तव पश्चिम किनारपट्टीवर दिसतो.पक्ष्याला काळजीपूर्वक रेस्क्यू करून सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलं. तिथे त्याला पशुवैद्यकीय अधिकाऱ्यां मार्फत प्राथमिक तपासणी करुन विश्रांती देण्यात आली. संपूर्ण प्रक्रियेमध्ये वाईल्ड अ‍ॅनिमल रेस्क्यूअर संस्थेचे मनित आणि प्रतीक यांनी अत्यंत दक्षता व तांत्रिक कौशल्याने काम केले.यानंतर संध्याकाळी सुमारे 4 वाजता, वाईल्ड अ‍ॅनिमल रेस्क्यूअर व दापोली वन विभाग यांच्या संयुक्त प्रयत्नातून या दुर्मीळ पक्ष्याला आंजर्ले येथील समुद्रकिनाऱ्यावर सुरक्षितरीत्या सोडण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button