अनोळखी व्यक्तीच्या मृतदेहाबाबत निवेदन.

रत्नागिरी, दि. 30 : अनोळखी मयत पुरुष नाव गाव समजून येत नाही, वय वर्षे अंदाजे 55 वर्षे दि. 19 जून रोजी सकाळी 11.30 वाजताच्या दरम्यान मौजे मिरजोळ, पडवेवाडी येथील रत्नागिरी रेल्वे स्टेशन येथील संगम हॉटेलच्या पडीक इमारतीच्या गाळ्यात बेशुध्द अवस्थेत पडलेला दिसून आला. कुवारबाव पोलीस चौकी येथील पोलीसांच्या मदतीने त्यास खासगी ॲब्युलन्समधून सिव्हील हॉस्पिटल येथे दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून दि. 19 जून 2025 रोजी दुपारी 2 वाजता च्या पूर्वी मयत झाल्याचे घोषित केले.

अनोळखी व्यक्तीचे वय अंदाजे 55 वर्षे, नाव पत्ता माहित नाही. अंगावर पांढरट रंगाचे मळकटलेले हाफ बाह्याचे टि शर्ट व नेसणीस राखाडी रंगाची हाफ पॅन्ट आहे. या व्यक्तीबद्दल कोणतीही माहिती असल्यास पोलीस निरीक्षक रत्नागिरी शहर पोलीस पोलीस ठाणे येथे संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात येत आहे.000

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button