राजापूर तालुक्यातील कुवेशीतील तरुणाची गळफासाने आत्महत्या.

राजापूर तालुक्यातील कुवेशीमधील जंगलात एक तरुण गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला. विघ्नेश संतोष कुवेसकर (२६, रा.कुवेशी, तेली वाडी, ता. राजापूर) असे मृत तरुणाचे नाव आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २६ जून रोजी दुपारी २च्या सुमारास कुवेशी येथील फणसे पेट्रोलपंपानजीक कोणीचा टेम येथे जंगलमय झाडाझुडपातील चारोळीच्या झाडाला नायलॉनच्या रस्सीने गळफास घेतलेल्या अवस्थेत विघ्नेश कुवेसकर हा तरुण आढळला. त्याच्या आत्महत्येमागील कारण अज्ञात असून पोलिसांनी आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद केली आहे.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button