
रत्नागिरी तालुक्यातील बोंड्ये कुणबीवाडी येथील महिलेचे भरदिवसा चोरट्यांनी घर फोडून 3 लाखांचे दागिने लंपास केले.
रत्नागिरी तालुक्यातील बोंड्ये कुणबीवाडी येथे घरपोडीचा प्रकार घडला आहे एका महिलेचे भरदिवसा चोरट्यांनी घर फोडून 3 लाखांचे दागिने लंपास केल्याची घटना शनिवारी दुपारच्या सुमारास घडली. फिर्यादी शुभांगी शिवाजी भोसले (वय ५७, व्यवसाय गृहिणी, रा. बोंड्ये कुणबीवाडी, ता. जि. रत्नागिरी) या काल दुपारी १२.३० ते ३.३० च्या सुमारास त्यांच्या वाडीतील डॉक्टरांकडे उपचारासाठी गेल्या होत्या. याच संधीचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने त्यांच्या घराच्या मुख्य दरवाजाचा कोयंडा तोडून घरात प्रवेश केला.
घरात प्रवेश केल्यानंतर चोरट्याने थेट बेडरूम प्रवेश करून लोखंडी कपाट फोडून सोन्याचे दागिने चोरून नेले. ही घटना शुभांगी भोसले घरी परतल्यानंतर त्यांच्या निदर्शनास आली. चोरीस गेलेल्या मालामध्ये ७ तोळे वजनाचे, सुमारे २ लाख ८० हजार रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र आणि अर्धा तोळा वजनाची, सुमारे २० हजार रुपये किमतीची सोन्याची कानातील कडी यांचा समावेश आहे. चोरीस गेलेल्या दागिन्यांची एकूण किंमत अंदाजे ३ लाख रुपये आहे.