पती, सासूच्या जाचातून विवाहितेची आत्महत्या. पतीसह सासूवर गुन्हा दाखल.

चिपळूण तालुक्यातील खांदाट-मोरवणेफाटा खांदाट-येथे विवाहितेने राहत्या घरी साडीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना बुधवारी घडली. पतीकडून होणारी मारहाण व सासूकडून शिवीगाळ तसेच दमदाटीला कंटाळून विवाहितेने आत्महत्या केल्याची फिर्याद मृत विवाहितेच्या वडिलांनी चिपळूण पोलीस ठाण्यात दिली. त्यानुसार गुरुवारी पतीसह सासूवर चिपळूण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.शकुंतला अशोक ’चव्हाण (२७, खांदाट-मोरवणेफाटा) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. तर अशोक मोतीराम चव्हाण, कमलाबाई मोतीराम चव्हाण (खांदाट-मोरवणेफाटा) अशी गुन्हा दाखल. झालेल्यांची नावे आहेत. याबाबतची फिर्याद विनायक जयसिंग राठोड (५५, लातूर) यांनी दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत शकुंतला चव्हाण ही विनायक राठोड यांची मुलगी आहे.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button